मला आणा कोल्हापुरी साज | Mala Aana Kolhapuri Saaz Marathi Lyrics

मला आणा कोल्हापुरी साज | Mala Aana Kolhapuri Saaz Marathi Lyrics

गीत – ग. दि. माडगूळकर
संगीत – राम कदम
स्वर – उषा मंगेशकर
चित्रपट – सोनाराने टोचले कान


एक हौस पुरवा महाराज
मला आणा कोल्हापुरी साज

( अहो काहीतरी करून बाईकडे बघून
कोल्हपुरी जाऊन, गुजरीत बसून
सोन्याचा साज तुमी घडवा
चला उठा दजिबा कोल्हापूरला तुमी आज )

अंग-रंग बघा तरी माझा केतकीचा मळा
निमुळता कंठ घाटदार सुरईचा गळा
उरी आले ओथंबून वय घाट आगळा
रूपासारिखे दागिने घडवा
पुखराज सोन्यामधे मढवा
त्याची अंगठी बोटामधे चढवा
एवढी अर्जी ऐकावी आज

गळ्यामधे कोल्हापुरी साज, अंगठी बोटी
घोड्यावर पुढ्यात मधे घेऊन बसा तुम्ही पाठी
राजाराणी दोघं जण हिंडू वारणाकाठी
घोडं टप टप दमानं निघू द्या
मला बेहोष आयुष्य जगू द्या
लोक पाण्यात बघतील बघू द्या
कुणी म्हणेल म्हणो रंगबाज

Leave a Comment