मंदिरीं शिवभूषण येतील | Mandiri Shivbhushan Yetil Marathi Lyrics

मंदिरीं शिवभूषण येतील | Mandiri Shivbhushan Yetil Marathi Lyrics

संगीत – दत्ता डावजेकर
स्वर – लता मंगेशकर
चित्रपट – थोरातांची कमळा


मंदिरीं शिवभूषण येतील
हृदयफुलांच्या पायघड्यांवर पदचिन्हें उठतील

अष्ट दिशांनो चवर्‍या ढाळा
शिरीष-जाई-जुई-चंपक उधळा
सिंहासन सोडून हृदयींचे आसन द्या म्हणतील

छत्रपतींच्या छत्राखाली
पिकती सदा तलवारी ढाली
महाराष्ट्राच्या महाभारती अर्जुन ते होतील

राजे ते नच मीही राणी
देशाची या करू निगराणी
विश्वाचा संसार आमुचा व्रत आमुचे उजळील

Leave a Comment

x