मनी वसे ते स्वप्नी दिसे | Mani Vase te Swapni Dise Marathi Katha | Marathi Story

कीर्तनकारबुवांचे स्वप्न | मनी वसे ते स्वप्नी दिसे | Mani Vase te Swapni Dise Marathi Katha 

Mani Vase te Swapni Dise Marathi Katha: एका गावात एक राजा होता तो कलावंताची खूप कदर करत असे. कोणताही कलावंत त्याच्याकडे गेला की तो त्यास बिदागी शिवाय वस्त्रालंकार देत व सन्मान करी. एकदा राजाने एका हुशार कीर्तनकारबुवांची कीर्तने ऐकली व त्यांना आनंदाने मौल्यवान वस्त्रे व अलंकार दे न त्यांचा सन्मान केला.

ही गोष्ट एका चांगल्या कीर्तनकारबुवांना कळली. त्यांच्या मनात आले की आपणही राजेसाहेबांकडे जावे व बक्षिस मिळवावे. जसे त्यांना राजेसाहेबांनी शिकरीस बरोबर येण्यास सांगितले परंतु ते घाबरट असल्यामुळे कसले जाणार. म्हणून त्यांनी चांगली संधी घालवली. पण आपल्याला जर महाराजांनी त्यांच्याबरोबर वनात येण्यास सांगितले तर आपण समोर वाघ जरी आला तरी घाबरणार नाही’ हे सर्व मनातील विचार कीर्तनकारबुवांनी रात्री आपल्या बायकोला सांगितले.

रात्रीची जेवणे झाल्यानंतर बुवांना झोप लागली. त्यांना झोपेत राजेसाहेबांनी आपल्याला बोलावले आणि ते आपल्या कीर्तनावर खूश झाले व त्यांनी आपल्याला भरपूर मानधन देऊन त्यांच्यासोबत शिकरीसाठी वनात घेऊन गेले असे स्वप्न पडले. स्वप्नात बुवा वनात गेल्यावर तेथील झाडातून एक मोठी वाघीण त्यांच्या अंगावर आली. ‘वाघीण वाघीण’ असे ओरडत त्यांनी जोरात लाथ मारली. ती लाथ त्यांच्या बायकोच्या कमरेत बसली व ती खाटेवरून खाली पडली.

आपली काही चूक नसताना पतीने आपल्याला का बरे मारावे. असा प्रश्न तिला पडला व ती पतीपाशी जाऊन म्हणाली ‘काय हो तुम्ही माझ्या करमरेत लाथ का माराली.

स्वप्नात असलेले बुवा बायकोला वाघीण समजून म्हणाले “जर तू मला खाण्यासाठी माझ्या अंगावर धावून आलीस तर मी तुला लाथ नको मारू तर काय करू. मी वाघिणीला दूर फेकण्याचे धैर्य दाखविले म्हणून महाराजांनी मला एक हजार रूपये बक्षिस दिले.”

पतिचे ते बोलणे ऐकून तिला समजले की नवऱ्याने आपल्याला वाघिणीच्या स्वप्नामुळे कमरेत लाथ मारली म्हणून ती पतिला हलवून म्हणाली “अहो तुम्ही राजेसाहेंबाबरोबर वनात गेलेले नसून तुमच्या घरात आहात आणि वाघीण समजून तुम्ही बायकोच्या कमरेत जोरात लाथ मारून बसला आहात. आता तरी जागे व्हा.”

त्याबरोबर बुवा स्वप्नातून बाहेर आले व त्यांनी घडलेल्या अपराधाबद्दल बायकोची क्षमा मागितली व ते म्हणाले, ‘मनी वसे ते स्वप्नी दिसे’ असे म्हणतात ते खरे आहे.

मित्रांनो तुम्हाला Mani Vase te Swapni Dise Marathi Katha हि कथा आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर नक्की करा.

Leave a Comment