मन मोहना तू राजा स्वप्नातला | Manmohana tu raja Swapnatla Marathi Lyrics

मन मोहना तू राजा स्वप्नातला | Manmohana tu raja Swapnatla Marathi Lyrics

गीतकार:विवेक आपटे
संगीत:अनिल मोहिले
गायक: आशा भोसले , रवींद्र साठे
चित्रपट: हमाल दे धमाल

आशा:
मन मोहना तू राजा स्वप्नातला
चल ये राजसा कसा लाभला एकांत हा तुला मला
रवींद्र :
आज तुझे हे रूप गोड ना भरवसा उद्याचा
खेळ तुझा प्रेमाचा घेईल जीव हमालाचा
आशा:
मी ताल लयीच्या जगात तुजला नेते
चल टाक पाऊले नृत्य तुला शिकविते
रवींद्र:
मोरपिसे लावून होई का  मयूर कावळ्याचा
आशा: ना
रवींद्र:
खेळ व्हायचा तुझा जायचा जीव हमालाचा
आशा:
हवा कशाला सरस्वतीचा अलंकार भाषेचा
शब्द येउदे ओठावरती मनातल्या प्रेमाचा
सहजपणे साकार होऊदे प्रेम भाव मनीचा
कशात आता अभिनय खोटा हसण्या रडण्याचा
रवींद्र:
आमच्या रडन्या हसण्याचा हा खेळ श्रीमंतीचा
आशा: ना
रवींद्र:खेळ व्हायचा तुझा जायचा जीव हमालाचा

Leave a Comment