मनोरथा चल त्या | Manoratha Chal Tya Marathi Lyrics

मनोरथा चल त्या | Manoratha Chal Tya Marathi Lyrics

गीत – ग. दि. माडगूळकर
संगीत – सुधीर फडके
स्वर – मालती पांडे ( बर्वे )
चित्रपट – सीता स्वयंवर


मनोरथा, चल त्या नगरीला
भूलोकीच्या अमरावतीला

स्वप्‍नमार्ग हा नटे फुलांनी
सडे शिंपिले चंद्रकरांनी
शीतळ वारा सारथि हो‍उनि
अयोध्येच्या नेई दिशेला !

सर्व सुखांचा मेघ सांवळा
रघुनंदन मी पाहिन डोळां
दोन करांची करुनी मेखला
वाहिन माझ्या देवाला !

Leave a Comment