चॅट करताना वापरा या स्पेशल टिप्स | Marathi Chatting Tips
आपल्याला अनेकदा हा प्रश्न पडतो की एखाद्यासोबत समोरासमोर बोलताना आपण अनेक गोष्टी पाळत असतो. मग ऑनलाईन चॅटिंग करत असताना काही टिप्स असतील का? तर हो, एकवेळा तुम्ही समोर बोलत असताना तुमच्या भावना समोरच्याला लवकर समजतात मात्र चॅटिंग मधून भावना समजावून सांगणं अवघड असतं. त्यामुळे अनेकदा आपल्याकडून चॅटिंग करत असताना चुका होतात आणि समोरचा व्यक्ती त्याचा चुकीचं अर्थ घेऊन बसतो.
अनेकदा आपल्या प्रियकराला मेसेज करायचा असतो मात्र चॅटिंग करताना चूक होऊ नये या भितीत आपण असतो. त्यामुळे ऑनलाईन चॅटिंग करताना काही टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर कदाचित समोरील व्यक्ती तुमच्यावर इंप्रेस होऊन त्याच मन तुम्ही नक्की जिंकू शकता.
प्रथम त्या व्यक्तीला समजून घ्या

आपण ज्या व्यक्ती सोबत बोलत आहोत त्या व्यक्तीविषयी कदाचित आपल्याला माहिती नसते. जर माहिती असेल तर त्या व्यक्ती विषयी आपण आपले तर्क वितर्क लावू शकतो मात्र जेव्हा एखाद्या अनोळखी किंवा फक्त एक ते दोन वेळा भेट झालेल्या व्यक्ती सोबत तुम्हाला आता चॅटिंग करायची आहे तर त्यासाठी सर्वात आधी तिला समजून घेणं गरजेचं आहे.
ऑनलाईन झालेली ओळख तुम्हाला जर पुढे सुरू ठेवायची असेल तर त्यासाठी आधी त्या व्यक्ती विषयी जाणून घ्या. त्यासाठी तुम्हाला त्या व्यक्तीला खालील मुद्द्यांवर बोलायला भाग पाडणे गरजेचे आहे. तुम्ही सर्वात आधी त्यांना शिक्षण आणि काय जॉब करताय या विषयी विचारणा करू शकतात. तुम्हाला जर त्या व्यक्तीकडून चांगले रिस्पॉन्स येत असतील तर त्यांची आजची स्थिती आणि भूतकाळात त्यांच्या सोबत काय घडले हे तुम्ही नक्की विचारू शकता. यामध्ये त्यांच्या कुटुंबा विषयी बोलणं थोडंसं अवघड वाटत असेल तर आपल्या कुटुंबाची आधी माहिती देऊन त्यांना देखील विचार तर तुम्हाला उत्तरे नक्की मिळतील.
एखाद्या व्यक्तीला समजून घेतल्यानंतर मग आपल्याला त्याच्याशी त्याच्या आवडीच्या विषयांवर आणि निगडित गोष्टींवर चर्चा करायला सोप्प जात असत. त्यामुळे चॅटिंग मध्ये देखील याचा फायदा होतोच.
चॅटिंग कशी सुरु करावी
ऑनलाईन चॅटिंग करत असताना अनेकदा आपल्या समोर बोलण कुठून सुरू करायचा हे प्रश्न असतात. मात्र एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन! त्यामुळे पहिला मेसेज करताना अनेक गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.
तुम्हाला चॅटिंग ची सुरुवात करायची असेल तर त्यासाठी एखाद्या गोष्टीवर प्रतिक्रिया देणं हे एक माध्यम आहे. म्हणजे तुम्ही त्यांनी पोस्ट केलेल्या एखाद्या पोस्ट वर कमेंट करून त्यांच्याशी बोलण्यास सुरुवात करू शकता. त्या व्यक्तीने एखादी स्टोरी ठेवलेली असेल तर त्याला उत्तम असा रिप्लाय करून देखील तुम्ही चॅटिंग सुरू करू शकतात.
सुरुवात करताना मेसेज हा फक्त हाय, हॅलो असा करू नये. अनेक व्यक्तींकडून त्यांना जे मेसेज येणार आहेत त्याकडे अनेकदा नॉर्मल लोकांकडून दुर्लक्ष केलं जातं. त्यामुळे एखादा स्टोरी रिप्लाय देत असताना देखील तो युनिक देण्याचा प्रयत्न करावा.
व्हॉट्सअँप सारख्या प्लॅटफॉर्म वर स्टिकर पाठवून देखील तुमच्या बोलण्याची योग्य सुरुवात नक्की होऊ शकते. यामध्ये तुमच्याकडून वाढदिवसाच्या निमित्त काही शुभेच्छा संदेश किंवा काही छान ओळी लिहून तुम्ही त्यांना पाठवल्या तर त्यांच्या ते कायम लक्षात देखील राहील. हीच तुमच्या चॅटिंग मधील सुरुवात असेल.
यामध्ये एक गोष्टीची काळजी घ्या. तुम्ही जर एखाद्या चुकीच्या मुद्द्यावर भांडत असाल तर त्या मुद्द्याला घेऊन पहिला मेसेज कधीच करू नका.
चॅटिंग मध्ये उत्तर कसे द्यावे
चॅटिंग मध्ये घडणाऱ्या प्रश्नांना उत्तरं देण्याचं भाग्य तुमच्याकडे आलं म्हणजे तुम्हाला आता चॅटिंग मध्ये एक प्रकारे सुरुवात करण्यास ग्रीन सिग्नल मिळत आहे. मात्र आता या प्रसंगात योग्य उत्तर नाही दिलं तर तुम्हाला नक्कीच प्रॉब्लेम येतील.
चॅटिंग मध्ये तुम्हाला मिळणारा रिस्पॉन्स हा वाईट आणि उत्साह दाखवणारा नसेल तर मग काय करायचे हे सर्वात महत्वाचं आहे. तुम्हाला जर त्या व्यक्तीकडून काम करून घ्यायचं आहे तर त्यांच्या नकारात्मक प्रश्नांना एकदा सकारात्मक पद्धतीने उत्तर देऊन बघा. प्रतिसादात बदल असेल तर पुढे जा अन्यथा चॅटिंग मध्ये होणार संभाषण तिथेच थांबवा.
चांगले उत्तर जर तुम्हाला मिळत असेल तर मग आता तुमच्याकडे चॅटिंग पुढे घेऊन जाण्याचा पर्याय आहे. तुम्ही प्रोफेशनल चॅटिंग मध्ये जात असाल तर गोष्टी थोड्या वेगळ्या होतील मात्र नॉर्मल बोलताना त्या व्यक्ती विषयी काहीतरी भन्नाट तुम्ही त्यांना लिहून पाठवू शकतात.
चॅटिंग करा फ्लरटिंग नाही!
अनेकदा आपल्याकडून चॅटिंग करत असताना आपण खूप काही भलत्याच गोष्टी बोलून जातो. यामध्ये आपण काही गोष्टींचे भान ठेवले तर आपल्याकडून चॅटिंग पुढे जाईल अन्यथा समोरील व्यक्ती त्याला फ्लरटिंग समजेल. कधीच जास्त उत्साही होऊन त्या व्यक्तीच्या मनात आपल्या बद्दल चांगल्या भावना आहेत तर काहीतरी बोलून जाऊ नका.
चॅटिंग साठी काही थोडक्यात टिप्स देतो आहे त्या नक्की वाचा
1. चॅटिंग करताना फक्त स्वतः बोलत बसू नका. समोरच्या व्यक्तीला जास्त बोलण्याची संधी द्या आणि स्वतः ऐकण्याची तयारी ठेवा.
2. भांडण होतील असे विषय टाळून दिवसभरातील थकवा जाईल असे मजेशीर विषय चॅटिंग मध्ये असू द्या.
3. चॅटिंग मध्ये रिप्लाय येत नसेल तर घाई करू नका. संयम राखायला शिका.
4. कुठल्याही विषयावर बोलताना स्वतः विषयी बढाई मारू नये.
निष्कर्ष
चॅटिंग करत असताना तुम्ही जर या सर्व टिप्स फॉलो केल्या तर तुम्हाला नक्कीच त्या व्यक्ती सोबत पुढे चांगले संबंध बनविण्यास मदत होईल. या टीप्स फक्त मुलांनी मुलींशी बोलताना किंवा मुलींनी मुलांशी बोलताना नव्हे तर प्रत्येक वेळी आपल्या चॅटिंग मध्ये सर्वांसोबत नक्की पाळल्या तर कोणीही नक्कीच दुखावणार नाही.