मी असा कसा वेगळा | Me Asa Kasa Vegla Marathi Lyrics

मी असा कसा वेगळा | Me Asa Kasa Vegla Marathi Lyrics

गीत -सुधीर मोघे
संगीत – आनंद मोडक
स्वर – दिलीप प्रभावळकर ,  अशोक सराफ
चित्रपट-चौकट राजा


पत्त्यामधले राजे आम्ही, केवळ मी निराळा !
मी असा कसा वेगळा ?

इस्पिक राजा दिमाखदार
किलवर नाजुक नक्षीदार
बदाम गोंडस अन्‌ दिलदार
नजर जगाची चुकवित फिरतो, मीच एक बावळा !

चौकटीत मी घुसमटलेला
तुमच्याहुन मी जरी निराळा
तरीही तुमचा, तुमच्यामधला
माझ्यावाचुन हा पत्त्यांचा खेळ पुरा पांगळा !

Leave a Comment