मी पतंग तू दोरा | Me Patang Tu Dora Marathi Lyrics

मी पतंग तू दोरा | Me Patang Tu Dora Marathi Lyrics

गीत – रघुबंधू
संगीत – राम कदम
स्वर – जयवंत कुलकर्णी ,  उषा किर्तने
चित्रपट – यालाच म्हणतात प्रेम


Me Patang Tu Dora Marathi Lyrics

मी पतंग तू दोरा
तू तुषार मी जलधारा

तुझे शिल्प हे घडविताना
असेल प्रभूची छान कल्पना
तुझ्या रूपाचा अनुपम नमुना वेड लावी भ्रमरा
मी पतंग तू दोरा

स्पर्श तुझा तो होता अवचित
सर्वांगाला करी रोमांचित
प्रेम आपुले करितो पुलकित लाजरा शहारा
तू पतंग मी दोरा

मौनातून हुंकार उमटला
स्वप्‍नातून आकार उमलला
मीलनात मज अर्थ उमजला प्रीत येई बहरा
तू पतंग मी दोरा

Leave a Comment