मी आज पाहिला बाई | Mee Aaj Pahila Bai Marathi Lyrics
गीत – ग. दि. माडगूळकर
संगीत – सुधीर फडके
स्वर – ललिता फडके
चित्रपट – चिमण्यांची शाळा
मी आज पाहिला ग बाई,
आईबापांचा माझ्या जावई !
मला पाहून उभा राहून तो ग गालात हसला थोडा
त्याला पाहुन गेले मोहुन, जीव लाजेने वेडा
जुन्या ओळखीची नवी नवलाई !
बाळपणात रानावनात जोडी-जोडीने फिरलो दोघे
शीळ भरीत खेळ करीत, दर्या-डोंगर केले जागे
धीर बोलाया आज का नाही ?
आज ओठांत अडतो बोल, उभ्याउभ्याच जातो तोल
एका झुळकीत फुलली जाई