मी जलवंती मी फुलवंती |Mee Jalwanti Mi Fulwanti| Marathi Lyrics

0
175
गीत -जगदीश खेबूडकर
संगीत -अनिल-अरुण
स्वर – अनुराधा पौडवाल ,  शैलेंद्र सींग
चित्रपट-नाव मोठं लक्षण खोटं

मी जलवंती मी फुलवंती, तुझी नजर लागंल मला
काय तुझ्या मनात, सांग माझ्या कानात जाईजुईच्या फुला रं
मी जलवंती मी फुलवंती, तुझी नजर लागंल मला
थांब जरा तिथं.. लाज वाटती !
काय म्हणू तिला ?.. ती हाय पिरती !
तुझ्या रुपाचं, रुपाचं डोळ्यात हासू फुटं
तुझ्या संगतीनं, संगतीनं उमलून पाकळी मिटं
रुसावं, हसावं, उगीच फसावं, कुठं ही शिकलीस कला ?
या पावसात झाले ओलेचिंब, गोर्‍या गाली मोतियांचे थेंब
दोघांत निवांत मिळाला एकांत, भेटीचा मोका आला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here