मी वाजवीन मुरली | Mee Vajavin Murali Marathi Lyrics

मी वाजवीन मुरली | Mee Vajavin Murali Marathi Lyrics

गीत – ग. दि. माडगूळकर
संगीत – वसंत पवार
स्वर – सुरेश हळदणकर
चित्रपट – अबोली


मी वाजवीन मुरली वृक्षीं बसून एका
होऊनिया मुकी तू वाळूंत काढ रेखा

कालिंदिचा किनारा, ते शांत संथ पाणी
राधामुकुंद दोघे, तिसरे न तेथ कोणी
माया तुझी नि माझी सांगू नकोस लोकां

लोकांस काय ठावे संबंध हे युगांचे
हे वेगळेच नाते प्रेमातल्या जगाचे
दिसतो जरी न वारा, झुलती कदंबशाखा

मायेत याच दोघे ये मायलेक होऊ
प्रीतीत याच राधे होऊ बहीणभाऊ
प्रेमास बंध नाही, ही बंधने तरी का ?

Leave a Comment