म्हातारा | Marathi Katha | Marathi Story

“A.D ११३ मध्ये मरण पावले रोमन सिनेटचा सदस्य प्लिनी धाकटा यांनी सांगितलेली एक सत्य कथा. गावात एक भला मोठा वाडा होता, प्रशस्त खोल्या असलेला. तो वाडा कुप्रसिद्ध होता. कोणीही त्या घरात जिवंत राहू शकले नाही. अमावाश्येच्या काळ्या रात्री तेथे भयानक आवाज येत असत. लक्षपूर्वक ऐकले तर लोकांडी साखळ्यांचा आवाज अगदी स्पष्ट ऐकू येत असे. याच आवाजान्मधून एक म्हातारा तेथे प्रकट होत असे. पाय बांधलेले, पिंजारलेले केस, वाढलेली दाढी असा किळसवाना तो म्हातारा.

तो वाडा अतिशय कमी पैशात भाड्याने देऊ केला तेव्हा अथेनोद्रौस नावाच्या एका तत्वज्ञाने तो वाडा भाड्याने घेतला आणि तेथे राहायला गेला. तेथे त्याला भयंकर गोष्टींचा अनुभव आला. एका रात्री त्याने त्या म्हाताऱ्याला त्या घरात पहिला. तो म्हातारा आला आणि घराच्या एका कोपऱ्यात विलीन झाला. हे सर्व त्याने पहिले.

दुसऱ्या दिवशी त्याने ती जागा खणण्यास सांगितली. त्या खणलेल्या जागी एक मानवी हाडांचा सापळा सापडला. साखळीने वेढलेला तो सापळा त्याच म्हतार्याचा होता.

त्या सापळ्याला योग्य ठिकाणी विधिवत दफन करण्यात आले. त्यानंतर त्या वाड्यात ते आवाज परत कधीच ऐकू आले नाहीत आणि तो म्हाताराही पुन्हा दिसला नाही.

Leave a Comment