मिटुन डोळे घेतले मी | Mitun Dole Ghetle Me Marathi Lyrics

मिटुन डोळे घेतले मी | Mitun Dole Ghetle Me Marathi Lyrics

गीत – ग. दि. माडगूळकर
संगीत – वसंत पवार
स्वर – आशा भोसले
चित्रपट – बाळा जो जो रे


Mitun Dole Ghetle Me Marathi Lyrics

मिटुन डोळे घेतले मी तरीही त्यांना पाहते
कोण मी अन्‌ कोण ते !

गाइल्यावाचून त्यांनी, गीत त्यांचे ऐकते
भेटल्यावाचून त्यांना गूज माझे सांगते

नाव नाही पुशियले मी, मीच काही योजिते
तेच ओठीं घोळताना मी स्वत:शी लाजते

भावनांचा भास का हा ? कल्पनांची कूजिते ?
वचन नाही घेतले मी वाट तरीही पाहते

बोलले काहीच ना ते, मी न काही जाणते
जोडते जीवांस दोन्ही मुग्ध नाते कोणते ?

Leave a Comment