मोबाईल शाप कि वरदान | Mobile Shap ki Vardan Marathi Nibandh

मोबाईल शाप कि वरदान | Mobile Shap ki Vardan Marathi Nibandh

मित्रांनो आजच्या या मराठी निबंधाच्या लेखात मी तुमच्या साठी घेऊन आलो आहे Mobile Shap ki Vardan Marathi Nibandh. या लेखात मी मोबाइल चे महत्व आणि मोबाईलचे फायदे तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे हा लेख पूर्ण वाचा.

Mobile Shap ki Vardan Marathi Nibandh:  मित्रांनो आजच्या या 21व्या काळात सर्वच क्षेत्रातील टेक्नॉलॉजी म्हणजेच तंत्रज्ञान दिवसेंदिवस विकसित होत चालले आहे. मोबाईलचे तंत्रज्ञान तर इतके वाढले आहे कि जगामध्ये झालेली हि एक मोठी क्रांतीचआहे. आज वयोवृद्ध असो कि तरुण  प्रत्येकाच्या हातात मोबाईल बघायला मिळत आहे. घरातल्या लँडलाईन फोनची जागा या मोबाईलने केव्हाच घेतली. पण कधी कधी या मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे मोबाईल नकोसा वाटू लागतो आणि त्यातूनच एक प्रश्न निर्माण होतो कि “Mobile Shap ki Vardan”

पण, मित्रांनो महत्वाची गोष्ट हि आहे कि ज्यावेळी नवीन टेक्नॉलॉजी जन्म घेते तेव्हा ती मानवाच्या सुखसोयी च्या द्रीष्टीनेच उदयास आलेली असते. मानवाचे कल्याण साधणे हाच त्या तंत्रज्ञाना मागेचे एकमेव उद्धेश असतो. तर मग Mobile सुद्धा एक विकसित स्वरुपाचे तंत्रज्ञान च आहे मग ते शाप कसे असेल? ते तर एक फार मोठे वरदानच आहे. पण आज काळ लहानांपासून मोठ्यांपर्यंत मोबाईलचा नको तितका आणि नको तसा अतिरिक्त वापर केला जायला लागला आहे, त्यावेळी मात्र हा Mobile phone शापच वाटू लागतो, मग तो दुसऱ्याचा असो किंवा आपलाच असो. आपल्याच मोबाईलवर येणारे ते SMS, ते  रात्रीअपरात्री चे कॉल्स अक्षरश: आयुष्य तणावपूर्ण करते. अर्थात, मोबाइलला फोनला स्विच ऑफ करून त्याचा बंदोबस्त आपण करू शकतो परंतु प्रत्येक वेळी फोन स्विच ऑफ करून चालत नाही किंवा कधी कधी फोन स्विच ऑफ करणे राहूनच जाते. आता हे तर झाले आपल्या मोबाईलचे पण दुसऱ्यांच्या मोबाईलची तर बातच अलग…

Mobile Shap ki Vardan Marathi Nibandh
Mobile Shap ki Vardan Marathi Nibandh

आजकाल कशाचे हि भान न ठेवता, तासनतास फोनवर गप्पा गोष्टी करणाऱ्या महिला, पुरुष आपल्याच दुनियेत गुंग असतात. महिला वर्ग तर कित्येकदा आजच्या जेवणाचा मेनू काय इथपासून त्याची आख्खी रेसीपी मोबाईलमधील youtube च्या माध्यमातून घेत असतात अशा वेळी त्या मोबाईलचा आपल्याला होणारा त्रास, दुसऱ्याला होणारा त्रास. कितीतरी वेळ बोलत राहिल्यामुळे स्वतःलाच भरावे लागणारे अतीचे बिल, स्वतःच्या व इतरांच्या ही आरोग्यावर होणारा परिणाम, होणारे प्रदूषण हे सारे अटळच असते. पण लक्षात कोण घेतय. सर्वांना सर्व कळते पण वळत नाही.

मोबाईल हा आजच्या काळातील प्रत्येकाच्या जीवनातील एक अतिशय महत्वाचा अविभाज्य घटक बनले आहे.  तरुण वर्ग, महिला वर्ग यांच्याकडे मोबाईल, सुरक्षिततेच्या दृष्टीने हा आता अत्यावश्यकच सुद्धा असतो. कोणतीही अप्रिय घटना, प्रसंग, रोड अपघात घडल्यास घरातल्या मंडळीशी संपर्क साधता यावा या दृष्टीने मोबाईल सारखे दुसरे जलद व प्रभावी साधन आज नाही आहे. या मोबाइल मुळेच  एका क्षणातच एकमेकांशी संपर्क साधून व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन योग्य तो निर्णय लगेच घेता येतो, मग अशा वेळी हा मोबाईल वरदान नाही असे कोण म्हणेल? पैसा,वेळ, श्रम वाचविण्यासाठी व त्यांचा अन्य चांगल्या कामांसाठी वापर करता येऊ शकतो. जगाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत अगदी कुठेही मोबाईलच्या माध्यामातून आपण पोहोचू शकतो. आज तर मोबाईल चे तंत्रज्ञान विकसित झाले आहे कि मोबाईलच्या त्या छोट्या स्क्रीनवर आपण संवाद साधलेल्या व्यक्तीला विडिओ कॉल च्या माध्यमातून प्रत्यक्ष पाहू शकतो. मागे वळून पहिले तर वाटते केवढी ही मोबाईलची क्रांती झाली आहे.

एखाद्या दूर देशीच्या, दूर ठिकाणाची महत्वाची माहिती मोबाईलवरून आपण आता घेऊ शकतो. मोबाईलद्वारे एखाद्या ठिकाणचे तापमान हवामान, आपण समजू शकतो,आवडते संगीत ऐकु शकतो. मोबाइलवरच कॅमेराची सोय असल्यामुळे कुठेही अगदी सहजपणे फोटो काढता येतात. मग आता हे सर्व सारे फायदे पाहिल्यावर मोबाईल वरदान नाही अशी बोलायची कोणाची हिम्मत? पण त्या मोबाइलला चा वापर मात्र योग्य रीतीने केला गेला पाहिजे हे ही तितकेच खरे आहे. मोबाईलचा नको तितका व नको तसा अतिरिक्त वापर करणे सर्वार्थाने चूक आहे.

मोबाइलला फोन चा जास्त वापर करणे हे नुसते अयोग्यच नव्हे तर कित्येक वेळी ते घातक देखील ठरते. कित्येकदा कार चालक किव्हा  मोटार सायकलस्वार आपले वाहन चालविताना खुशाल मोबाइल वर बोलत असतो. अशाने अपघाताची दाट शक्यता असते. नियम धाब्यावर बसवून कायद्याचे उल्लंघन करून वाट्टेल तिथे मोबाईल फोनचा वापर केलेला दिसतो. आता परवाच बघा ना मी भाजी आणायला मार्केट मध्ये जात होतो तर चक्क एका पोलिस कर्मचाऱ्यालाच मी बाईक चालवत असताना फोनवर बोलताना पहिले . त्यावेळी मी त्याला त्याची चुकी दाखवण्याचा प्रयत्न ही केला असता पण तो वेगाने गाडी चालवत होता अन मी एका रस्ता ओलांडत होतो. सांगायचे तात्पर्य इतकेच कि असा हा मोबाईलचा वापर टाळला पाहिजे. मोबाईलवरचा SMS आणि spam calls  प्रकार तर किती तरी गुन्हयांना निमंत्रण देत आहेत. कधी कधी तर पोलिस स्टेशनच्या पायऱ्या देखील चढाव्या लागत आहेत.

मोबाईलवरून सारखे फोन करत राहणे, एखाद्या कार्यक्रमा निमित्त एकत्र येणार असू तर त्यासाठी कमीत कमी 4 ते 5 फोन्स तर आवश्यकच होत असतात. खर तर मोबाईल नसतानाही भेटी गाठीचे प्लानिंग अगदी पद्धतशीरपणे होत असे. मोबाईलमुळे अधिक कार्यक्षम होतो हे हि खरेच! कित्येकदा मोबाईलचा खूप त्रास हि होतो, कधी कधी तर मोबाईलवरून काही माणसे इतक्या मोठ्या आवाजात बोलत असतात कि बोलणाऱ्याला सांगावेसे वाटते कि “अरे बाबा, आणखीन जरा आवाज काढलास तर तो मोबाईल न वापरताही तुझे नुसते बोलणे त्याला ऐकू जाईल”. मित्रांनो मोबाईल फोन हा सगळीकडेच असतो पण त्याचा दुरुपयोग होणार नाही याची दक्षता आपल्याला घ्यायला हवी. मोबाईलवरचा कॅमेराही कधी कधी कुरापत काढणारा; गुन्ह्यात भर टाकणारा ठरतो. मिस्सड कॉल हा ही त्यातलाच एक प्रकार!

Final Words

मित्रांनो मोबाईलचा अतिरिक्त वापर हा अनेक शारीरिक व्याधींना निमंत्रण देणारा ठरत चालला आहे. मेंदू, किडनी,हृदय इत्यादी अवयवावरही  मोबाईल फार मोठा परिणाम करू शकतो. एकूणच सोप्या भाषेत बोलायचे झाले तर, तर मोबाईलचा योग्य वापर केला तर मोबाईल वरदानच आहे नाही तर शाप!

प्लिज नोट: मला आशा आहे तुम्हाला हा मोबाईल शाप कि वरदान | Mobile Shap ki Vardan Marathi Nibandh आवडला असेल.

जर तुमच्या कडे सुद्धा Mobile Shap ki Vardan Marathi Nibandh वर अशाच प्रकारे कोणता निबंध असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंद करा. आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुम्ही दिलेला निबंध खूप लोकांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करु..

तसेच तुम्हाला हा मोबाईल शाप कि वरदान वर मराठी निबंध आवडला असेल तर Whatsapp आणि facebook द्वारे तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

Aamchya Gavchi Jatra Marathi Nibandh

500+ Essay Writing Topics and Ideas

मित्र आणि मैत्रीणींनो मी पूजा शिंदे. मला लहान पानापासूनच लिहायला आवडते आणि इंटरनेट वर आल्यावर मला एक गोष्ट समजली कि इंटरनेट वर मराठी मध्ये जास्त कोणी माहिती अपलोड करत नाही आहे. मराठी ही आपली राज्यभाषा आहे आणि आपण मराठी असल्याचा आपल्याला गर्व असला पाहिजे म्हणूनच मी या वेबसाईट द्वारे मराठी भाषेचे जतन करण्याचा प्रयन्त करत आहे.

7 thoughts on “मोबाईल शाप कि वरदान | Mobile Shap ki Vardan Marathi Nibandh”

  1. छान लेख आहे. आपण मराठी असल्याचा अभिमान आहे.आपल्या मराठी ला आपणच मोठे केले पाहिजे.
    जय शिवराय जय महाराष्ट्र

    Reply
  2. खूप छान निबंध आहे आणि आपल्या मातृभाषेत लिहिल्यामुळे तो अधिकच प्रभावी वाटतो. निबंधामध्ये विद्यार्थांना पटकन समजावी अशी वाक्यरचना केलेली असल्यामुळे तो लगेच आठवतो.

    Reply

Leave a Comment