मोठंमोठं डोळं तुझं | Motha Motha Dola Tuza Marathi Lyrics

मोठंमोठं डोळं तुझं | Motha Motha Dola Tuza Marathi Lyrics

गीत – ग. दि. माडगूळकर
संगीत – सुधीर फडके
स्वर – ललिता फडके
चित्रपट – जशास तसे


मोठंमोठं डोळं
तुझं कोळ्याचं जाळं
माझ्या डोळ्याची मासळी त्यात गावायची नाय्‌ रं

नको दावू धाक
मला, डोळं तुझं झाक
आल्यागेल्या भुलतिल, मी भुलायची नाय्‌ रं

लाडीगोडी सोड
भारी बोलणं तुझं गोड
सवालाला जबाब मी देणार नाय्‌ रं

असशिल मोठा नाग
तर केवड्याखाली वाग
गुलाबाचा गेंद तुला लाभायचा नाय्‌ रं

शिकारीची हाव
तुला, हरिणीमागं धाव
रानांतली साळू तुला मिळायची नाय्‌ रं

पुरे तुझी ऐट
माझ्या बापाला भेट
लगीन झाल्याबगार मी बधायची नाय्‌ रं

Leave a Comment