नाकात वाकडा नथीचा | Naakat Vakda Nathicha Marathi Lyrics

नाकात वाकडा नथीचा | Naakat Vakda Nathicha Marathi Lyrics

गीत – ग. दि. माडगूळकर
संगीत – राम कदम
स्वर – उषा मंगेशकर ,  जयवंत कुलकर्णी
चित्रपट – वैभव


Naakat Vakda Nathicha Marathi Lyrics

नाकात वाकडा नथीचा आकडा
मोत्यांचं कुलूप ओठांच्या कवाडा
बंदोबस्त का ग केला एवढा ?

बोलांचं माणिक, हसण्याचं हिरं
रत्‍नांनी भरला रूपाचा वाडा
तुझ्यावाणी वेडा, घालिल दरोडा
बंदोबस्त केला म्हणुन एवढा

येऊन गुपचूप तोडीन कुलूप
अरं भलतेच नको रं बोलू उनाडा

घालिन दरोडा धुंडीन वाडा
पायांत पडंल रं जन्माचा खोडा
सोशीन खोडा हवा तेवढा
आधीच कशाला तंटाबखेडा
तुझा माझा जोडा, पायी घाल खोडा
अंगणी झडू दे सनई-चौघडा

Leave a Comment

x