नाचत नाचत गावें | Nachat Nachat Gave Marathi Lyrics
गीत – जगदीश खेबूडकर
संगीत – सुधीर फडके
स्वर – सुधीर फडके
चित्रपट – बाजिरावाचा बेटा
नाचत नाचत गावें, ब्रह्मानंदीं तल्लिन व्हावें
आज कशाची किमया घडली, कणकण गंधित झाला
एक अनामिक आनंदानें जीवच मोहुन गेला
या वेडाच्या लहरीसंगे तन्मय होउन जावें
माझी मजला जाण नसावी, अंतर माझे भोळें
अवघी काया वार्यावरतीं सूरच होउन डोले
अणुरूपानें परमात्म्याला भेटुन मागे यावें
आयुष्याला उधळित जावें केवळ दुसर्यापायीं
या त्यागाच्या संतोषाला जगिं या उपमा नाही
जन्म असावा देण्यासाठीं एक मनाला ठावें