नाचतो डोंबारी रं | Nachato Dombari ra Marathi Lyrics
गीत – जगदीश खेबूडकर
संगीत – राम कदम
स्वर – कृष्णा कल्ले , बालकराम , सुलोचना चव्हाण
चित्रपट – केला इशारा जाता जाता
Nachato Dombari ra Marathi Lyrics
ढमाढम ढोल रं झमाझम झांझरी
नाचतो डोंबारी रं नाचतो डोंबारी
उद्याच्या पोटाची काळजी कशाला
आभाळ पांघरु दगड उशाला
गाळुनी घाम असा मागूया भाकरी
नाचतो डोंबारी रं नाचतो डोंबारी
सोळातली नार मी रंग माझा बैंगणी
उर होई खाली-वर सूरत माझी ठेंगणी
जवानीनं तोडली रं रानफूल डोंगरी
नाचतो डोंबारी रं नाचतो डोंबारी
विसावं वरीस आलंया भराला
भिंगाची चोळी रं दाटते उराला
सोन्याचा माड असा शंभर नंभरी
नाचतो डोंबारी रं नाचतो डोंबारी
हातामधी घेतली आडवी चिवाटी
तारेवरी डोलता नाचतो कोल्हाटी
माणसं झाली का रं कावरी बावरी
नाचतो डोंबारी रं नाचतो डोंबारी
कोल्हाटी अंगाची वाकली कमान
कोलांटी मारतो गिरक्या घेऊन
करती कवतूक शेजारी-पाजारी
नाचतो डोंबारी रं नाचतो डोंबारी
काठी भली लांबडी दातांनी धरितो
वार्यावर घुमुनी रिंगण घालितो
चढुनी उतरीतो पायरी पायरी
नाचतो डोंबारी रं नाचतो डोंबारी
जात अशी रांगडी, भोळी तशी भाबडी
भल्यासंगं भली रं, बुर्यासंगं वाकडी
पायाला आमुच्या रं बांधली भिंगरी
नाचतो डोंबारी रं नाचतो डोंबारी