नगरी नगरी ही सौंदर्याची | Nagari Nagari Hi Soundaryachi Marathi Lyrics

नगरी नगरी ही सौंदर्याची | Nagari Nagari Hi Soundaryachi Marathi Lyrics

गीत – प्र. के. अत्रे
संगीत – दत्ता डावजेकर
स्वर – पं. उदयराज गोडबोले
नाटक – अशी बायको हवी !


नगरी.. नगरी ही सौंदर्याची खाण

कुणी पद्मिनी कुणी चित्रिणी
मीनाक्षी कुणी हरिणाक्षी कुणी
त्यातिल दो नयनांचे मजवरि झाले शरसंधान

सुंदरतेच्या कथाहि सुंदर
सुंदरतेच्या व्यथाहि सुंदर
सुंदर या हृदयी रुतलेला सुंदर तोहि बाण

जिकडे तिकडे सुंदर सुंदर
त्यातच मीही झालो सुंदर
खरोखरी परमेश्वर सुंदर, त्याचे हे वरदान

Leave a Comment