नको ताई रुसू | Nako Tai Rusu Marathi Lyrics

नको ताई रुसू | Nako Tai Rusu Marathi Lyrics

गीत – मधुकर जोशी
संगीत – श्रीनिवास खळे
स्वर – आशा भोसल


नको ताई रुसू, कोपर्‍यात बसू
येउ दे ग गालात खुदकन हसू

इवल्याशा नाकावर मोठा मोठा राग
देऊ काय तुला हवे ते ग माग
नवरा हवा का लठ्ठ हवी सासू ?

बाहुलीच्या लग्‍नाचा खेळ गडे खेळू
लग्‍नात बुंदीचे लाडू आता वळू
नवीन कपड्यात छान छान दिसू

चांदीचे ताट तुला चंदनाचा पाट
केशरीभात केला आहे मोठा थाट
ओठात आले बाई लडिवाळ हसू

Leave a Comment

x