नवीन आज चंद्रमा | Naveen Aaj Chandrama Marathi Lyrics

नवीन आज चंद्रमा | Naveen Aaj Chandrama Marathi Lyrics

गीत – ग. दि. माडगूळकर
संगीत – सुधीर फडके
स्वर – उषा अत्रे-वाघ ,  सुधीर फडके
चित्रपट – उमज पडेल तर


नवीन आज चंद्रमा, नवीन आज यामिनी
मनीं नवीन भावना, नवेच स्वप्‍न लोचनी !

दूर बाल्य राहिले, दूर राहिल्या सखी
बोलण्या कुणासवे सूर दाटले मुखी
अननुभूत माधुरी आज गीत गायने

अनादि चंद्र अंबरी, अनादि धुंद यामिनी
यौवनात तू नवी मदीय प्रीत-स्वामिनी
घर न प्रीतकुंज हा, बैस ये सुहासिनी

कोण बाइ बोलले ? वाणि ही प्रियंवदा
या मनात नांदते तुझीच प्रीतसंपदा
कशास वेगळेपणा ? जवळ ये विलासिनी

Leave a Comment