पहिले भांडण केले कोणी | Pahile Bhandan Kele Koni Marathi Lyrics

पहिले भांडण केले कोणी | Pahile Bhandan Kele Koni Marathi Lyrics

गीत – ग. दि. माडगूळकर
संगीत – सुधीर फडके
स्वर – मालती पांडे ( बर्वे )
चित्रपट – लाखाची गोष्ट


Pahile Bhandan Kele Koni Marathi Lyrics

पहिले भांडण केले कोणी ?
सांग रे राजा, कशि रुसून गेली राणी

अडखळला का पाय जरा ?
वळता, गळला का गजरा ?
लटका होता राग मुखावर, डोळ्यांत लटके पाणी

मान वेळता खेळ कळे
दंवात फुलले दोन कळे
थरथरणारे ओठ जहाले क्षणांत हसल्यावाणी

कलह प्रीतिचा गोडीचा
विलास जमल्या जोडीचा
विरह नकोसा, तरीही सुंदर, जीव गुंतता दोन्ही !

Leave a Comment

x