पांडव व द्रौपदी विवाह | Marathi Katha | Marathi Story

पांडव पांचाल देशाच्या छत्रवती नावाच्या राजधानीत आले. तेथे द्रुपद याज्ञसेनी नावाचा राजा होता. त्याने आपल्या मुलीच्या विवाहासाठी मत्स्यवेधाचा कठीण पण लावला होता. त्यासाठी अनेक देशाचे शेकडो राजे व राजकुमार तेथे मंडपात जमले होते.

मंडपातील कोणालाही मत्स्यवेध करता आला नाही. परंतु तो अर्जुनाने केला.

पांडव द्रौपदीला घेऊन निघाले. इतर देशाचे राजे त्यांना अडवू लागले. परंतु पांडवांनी त्यांना मारून पळवून लावले.

घरी गेल्यावर अर्जुन म्हणाला, “आई, भिक्षा आणली आहे.”

तेव्हा कुंती आतून म्हणाली, “पाच जण वाटून घ्या.”

द्रुपद राजा त्यांच्या मागोमाग आला. तेव्हा कुंतीने त्याला सांगितले, “द्रौपदी ही पाच भावांची बायको होईल.”

द्रुपदाल ते विचित्र वाटले.

तेव्हा तेथे धर्माचे महान ज्ञाते व्यासमहामुनी आले व त्यांनी द्रुपदाला समजावले.

अशा प्रकारे पाच भावांचा द्रौपदीशी थाटामाटाने विवाह झाला.

तेव्हा पांडव व श्रीकृष्ण यांची मैत्री झाली.

पांडव हस्तिनापुरात आले तेव्हा मोठे भांडण होणार असे वाटू लागले. परंतु भीष्माचार्य, द्रोणाचार्य, विदुर, गांधारी, व्यास इत्यादींनी मार्ग काढला.

पांडवांना खांडववन आणि त्यापलीकडील भाग देण्यात आला. तेथे त्यांनी हिस्त्र पशू मारले आणि मयासुराच्या मदतीने इंद्रप्रस्थ नावाचे एक उत्तम नगर वसवले.

तेथे शेती सुरू झाली, बाग-बगीचे तयार झाले, अनेक उद्योग वाढले, व्यापार चालू झाला, प्रजा सुखाने राहू लागली.
पांडवांनी श्रीकृष्णाचा विचार घेऊन राजसूय यज्ञ करण्याचे ठरविले.

Leave a Comment