पांडवांचा पराभव | Marathi Katha | Marathi Story

शकुनीने पांडवांचे सर्व वैभव घेऊन त्यांना परत नेस्त नाबूत करायचे असे ठरवून धृतराष्ट्राशी संगनमत केले.
लगेचच धृतराष्ट्राने युधिष्ठिराकडे निरोप पाठविला. ‘तुम्ही केलेला यज्ञ उत्तम रितीने पार पडल्याचे ऐकून फार आनंद झाला. तुम्ही सगळे आता खूप थकले असाल. काही दिवस आमच्याकडे या. गप्पागोष्टी करू. द्यूत खेळू. आणि मौजमजा करू.”

युधिष्ठिर सर्व गुणांनी खूप चांगला होता; परंतु द्यूत म्हटले, की त्याला एक प्रकारची भुरळ पडत असे.

पांडव हस्तिनापुरात आले व लगेचच द्यूत सुरू झाला. पांडवांतर्फे युधिष्ठिर व कौरवांतर्फे शकुनी खेळू लागले. तेथील थाट काही वेगळाच होता. जरी-मखमलीचा पट होता. सोन्या-चांदीच्या सोंगटया होत्या. हस्तिदंताचे फासे होते. कोणी असे म्हणतात की, त्यांवर लोखंडी खिळे होते आणि शकुनीच्या बोटांत लोहचुंबकाच्या अंगठया होत्या. आणि असेही म्हटले जाते की, ते फासे देखील जादूचे होते.

खेळायला सुरूवात झाल्यावर सुरवातीचे एक-दोन डाव युधिष्ठिर जिंकला. पण नंतर तो हरू लागला. त्याच्याकडचे सोने-नाणे, रत्ने, मोती, हत्ती, घोडे, एवढेच नाही तर त्याचे राज्य सगळे काही तो त्यात हरला.

नंतर त्याने आपले भाऊ पणाला लावले. स्ततःला पणाला लावले. युधिष्ठिर खेळत असताना त्याला जशी द्यूताची नशा चढली होती. त्यामुळे तो वेडाच झाला होता. त्याने शेवटी द्रौपदीला पणाला लावले.

ते बघून शकुनीने फासे टाकले व तो ओरडला, “ही जिंकली!”

ते पाहून दुःशासन आनंदाने नाचू लागला. तो म्हणाला, “आता पांडव आमचे दास आणि द्रौपदी आमची दासी!”

दुर्योधन आनंदाने ओरडला, “दुःशासना, अरे, नुसता नाचतोस काय? त्या दासीला येथे ताबोडतोब घेऊन ये.

Leave a Comment