पाण्या तुझा रंग कसा | Panya Tuza Rang Kasa Marathi Lyrics

पाण्या तुझा रंग कसा | Panya Tuza Rang Kasa Marathi Lyrics

गीत – ग. दि. माडगूळकर
संगीत – सुधीर फडके
स्वर – आशा भोसले
चित्रपट – पोस्टातली मुलगी


Panya Tuza Rang Kasa Marathi Lyrics

पाण्या, तुझा रंग कसा ?
ज्याला जसा हवा तसा !

चांदराती चंद्रापरी
काळ्या राती कृष्णापरी
या रे कुणी तीरी बसा
ज्याचा त्याला दिसेल ठसा !

पाण्या, तुझा गंध कसा ?
मेळ ज्यासी घडे तसा !

फेका तरी हार ताजा,
मोगर्‍याचा वास माझा
चंदनाने चंदनसा
गंधकाने गंधकसा !

पाण्या तुझा स्वाद कसा ?
ज्याला जसा हवा तसा !

साखरेने गोड करा,
द्राक्षरसे मधुर जरा
अमृताने अमृतसा,
विषासवे विष जसा !

येती किती जाती किती,
त्याची मला नाही भीती
वाहतसे नित्य असा,
कुणी हसा कुणी रुसा !

Leave a Comment