3 ते 4 वर्षांपासून जुन्या नात्याचे ब्रेकअप झाले आहे, काय करावे?

नाते हे जीवनाचे अविभाज्य अंग आहे. कुठलेही नाते हे माणसाच्या स्वभावावर अवलंबून असते. रक्ताचे नाते हे आपलेपणाची जाणीव करुन देते. पण रक्ताच्या नात्यांपेक्षा मित्र, सहयोगी, शेजारी ही नाती जीवनात महत्त्वाची आहेत. कधी कधी नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो.याचे कारण म्हणजे एकमेकांबद्दल होणारे गैरसमज, पण हे गैरसमज तात्काळ दुर केले पाहिजेत. समोरच्या कडुन प्रतिसाद मिळाला नाही तरी तुम्ही पुढाकार घ्या. आपली भुमिका मांडा. स्व,अहंम, बाजुला सारून मनाचा मोठेपणा दाखवा. प्रसंगी माफी मागा. माफी मागितली म्हणजे हार मानली असे नाही. ती आपली वैचारीक परिपक्वता आहे.आपले असे वर्तन निश्चितच समोरच्या ला एक दिवस विचारप्रवण करेल. व नात्यांमधील दुरावा कमी होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *