फूल ते संपले गंध | Phool Te Sampale Gandh Marathi Lyrics

फूल ते संपले गंध | Phool Te Sampale Gandh Marathi Lyrics

गीत – मंगेश पाडगांवकर
संगीत – श्रीनिवास खळे
स्वर – सुरेश वाडकर


फूल ते संपले, गंध ना राहिला
हाक तू ऐकिली, साद नाही दिला

मार्ग माझा अता चालतो एकला
मी न कोणी इथे, नाहि मी येथला
शून्य काळोख हा अंतरी साहिला

सोसुनी वेदना गीत गातो कुणी
लेखुनी क्षुद्र त्या आणि जातो कुणी
मीहि जागेपणी खेळ हा पाहिला

भेट झाली तिची याद ठेवू नये
आणि स्वप्‍नामधे भेट घेऊ नये
तू सुखी हो तिथे, शाप माझा मला

Leave a Comment

x