फुलं स्वप्‍नाला आली ग | Phula Swapnala Aali Ga Marathi Lyrics

फुलं स्वप्‍नाला आली ग | Phula Swapnala Aali Ga Marathi Lyrics

गीत – जगदीश खेबूडकर
संगीत – सुधीर फडके
स्वर – उषा मंगेशकर ,  कृष्णा कल्ले
चित्रपट – जोतिबाचा नवस


Phula Swapnala Aali Ga Marathi Lyrics

नवतीची, प्रीतिची, काया शिणगार ल्याली ग
फुलं स्वप्‍नाला आली ग !

धुंदीत डोलते वार्‍याने फुलते कळी, फुलुन आली कळी
दंवात बुडली पानात दडली खुळी, कशी ग बाई खुळी
पाखरू घुमलं, गाण्यात रमलं, घुमतंया अंतराळी
ओढ ही, भेट ही, जिवाशिवाची झाली ग
फुलं स्वप्‍नाला आली ग !

स्वप्‍नात हसतो संसार दिसतो असा, महाल बाई जसा
येईल अंगणा साजण देखणा कसा, मदन बाई जसा
हातात हात ग, गुलाबी साथ ग, चंद्राचा शिडकावा
कावरी, बावरी, रात किरणांत न्हाली ग
फुलं स्वप्‍नाला आली ग !

नवी मी नवरी मुलखाची लाजरी राणी, राजाची माझ्या राणी
अंगाला चढलं, कळसाचं पिवळं पाणी, हळदीचं नवं पाणी
डोळ्याची पापणी मिटून साजणी गाऊ मिळून गाणी
कोण मी, कोण तू, जाण विसरून गेली ग
फुलं स्वप्‍नाला आली ग !

Leave a Comment

x