पोपट आणि चिमणी | Popat aani Chimani Marathi Katha
एका बागेत एक लहान पोपट रहात असे. त्याची व एका चिमणीची मैत्री झाली. चिमणी बागेत इकडेतिकडे उडया मारून आपले भक्ष्य मिळवीत असे व वरचेवर येऊन त्या पोपटास भेटत असे. तिचा प्रेमळ स्वभाव पाहून पोपटास आनंद होत असे.
तो एकदा आपल्या आईस म्हणाला, ‘आई, ही चिमणी किती चांगल्या स्वभावाची आहे! इतकी चांगली मैत्रीण दुसर्या कोणास क्वचितच लाभली असेल.’ हे ऐकून त्याची आई म्हणाली, ‘आणि तुझ्यासारखा मूर्ख मुलगाही दुसर्या कोणास क्वचितच लाभला असेल! ‘अरे, ही चिमणी आज तुला इतकी चांगले वाटते आहे, पण उदया हिवाळा सुरू झाल्यावर तू जेव्हा थंडीत कुडकुडत बसशील, तेव्हा ही मात्र तुझ्यापासून लांब कुठेतरी मजा करीत असेल.’
तात्पर्य :- कोणत्याही माणसाशी मैत्री करण्याआधी त्याच्या स्वभावाची चांगली पारख करून घ्यावी.