प्रथम तुला वंदितो | Pratham Tula Vandito Marathi Lyrics

प्रथम तुला वंदितो | Pratham Tula Vandito Marathi Lyrics

गीत -शांताराम नांदगावकर
संगीत – अनिल-अरुण
स्वर – अनुराधा पौडवाल ,  पं. वसंतराव देशपांडे
चित्रपट-अष्टविनायक
राग -यमन


प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना, गणराया

विघ्‍नविनाशक, गुणिजन पालक, दुरित तिमीरहारका
सुखकारक तू, दुःख विदारक, तूच तुझ्यासारखा
वक्रतुंड ब्रह्मांडनायका, विनायका प्रभुराया

सिद्धीविनायक, तूच अनंता, शिवात्मजा मंगला
सिंदूर वदना, विद्याधिशा, गणाधीपा वत्सला
तूच ईश्वरा सहाय्य करावे हा भवसिंधू तराया

गजवदना तव रूप मनोहर, शुक्लांबर शिवसूता
चिंतामणी तू अष्टविनायक सकलांची देवता
रिद्धीसिद्धीच्या वरा, दयाळा, देई कृपेची छाया

Leave a Comment

x