प्रिया आज आले | Priya aj ale Marathi Lyrics
गीत -शांताराम नांदगावकर
संगीत – अरुण पौडवाल
स्वर – अनुराधा पौडवाल
Priya aj ale Marathi Lyrics
प्रिया आज आले मैफलीत माझ्या
रंग-सूर ल्याली पश्चिमा, गीतास आली लालीमा !
तुझी साद ऐकुनी मी रे फुलारून आले
सूरांतल्या चैतन्याने मीच गीत झाले
अमृतात न्हाली पौर्णिमा, प्राणांत उमले चंद्रमा
हळूहळू निशिगंधाचे प्रीतस्पर्श प्याले
निशांत हा होता मी रे उषास्वप्न झाले
लाविता तुझ्या मी कुंकुमा, हासे नभाची नीलिमा