रात चांदणी गंध चंदनी | Raat Chandani Gandh Chandani Marathi Lyrics

रात चांदणी गंध चंदनी | Raat Chandani Gandh Chandani Marathi Lyrics

गीत – मधुसूदन कालेलकर
संगीत – सुधीर फडके
स्वर – आशा भोसले ,  सुधीर फडके
चित्रपट – लग्‍नाला जातो मी


रात चांदणी, गंध चंदनी, आज लोचनी हवास तू
रात चांदणी, गंध चंदनी, आज लोचनी हवीस तू

नकोस पाहू, नकोस ऐकू, प्रीतिचे हितगूज फुला
नयन बोलु दे, नयन ऐकु दे, आळवु दे अनुराग मला
धुंद छेडुनी, विरहरागिणी, सूर बंधनी हवास तू

सहज बोलले, उगिच हसले आणि विसरले मीच मला
काही न कळले, अंतर सरले, जीव अचानक मोहरला
लाजलाजुनी, एक चांदणी, बोलली मनी हवास तू

मिटुन पापणी, घेता सजणी, जाणवते का जाग उरी
चंद्र दर्पणी, तुला पाहुनी, लाज कशाला या अधरी
स्वप्‍न मीलनी, चित्त कोंदणी, आज चिंतनी हवास तू

Leave a Comment