रजनीगंधा जीवनी या | Rajanigandha Jeevani Ya Marathi Lyrics

रजनीगंधा जीवनी या | Rajanigandha Jeevani Ya Marathi Lyrics

गीत -शांताराम नांदगावकर
संगीत – अनिल-अरुण
स्वर – अनुराधा पौडवाल

रजनीगंधा जीवनीं या बहरुनी आली
मनमीत आला तिच्या पाऊलीं
फुलल्या मनाच्या मुक्या पाकळ्या
झुलल्या लता आज प्रीतीतल्या
अशी आली, प्रीती ल्याली, नवी ही कळी
रजनी अशी ही निळीसांवळी
किरणांत न्हाली धरा मल्मली
अशा वेळी, प्रिया येई, फुले लाजली

Leave a Comment