राजमाता जिजाई | Rajmata Jijau Marathi Nibandh | Rajmata Jijau marathi essay

राजमाता जिजाई | Rajmata Jijau Marathi Nibandh

Rajmata Jijau Marathi Nibandh: स्वतः च्या कर्तुत्वामुळे  थोर पती मिळाला आणि त्यांचे आयुष्य कीर्तिमंत ठरले, अशा नामवंत स्त्रीया या जगात पुष्कळ आहेत. पण मुलगा अत्यंत थोर व कर्तबगार निपजल्यामुळे जिच्या मातृत्वाची कीर्ती चहूकडे वर्षानुवर्ष गाजत राहिली आहे अशी एकमेव  भाग्यवती स्त्री म्हणजे  राजमाता जिजाबाईच… आपल्या श्री. छत्रपतींची माता.

जिजाबाई ह्या सरदार लखूजी जाधवराव यांची कन्या. त्यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी (पौष पौर्णिमा शके १५१९) रोजी सकाळी दहा वाजता सिंदखेड- राजा जि. बुलढाणा येथे झाला. शिंदखेडचे जाधवराव निजामशहाच्या पदरी मोठे मातब्बर सरदार होते. तर वेरूलचे मालोजी भोसले यांचा मुलगा शहाजी राजे  हे अतिशय तल्लख दिसणारे . जीजाईच्या मनात लहानपणीचा शहाजी भरून राहिलेले . पण मालोजी भोसले व लखुजी जाधवांचे जुने वैर. परंतु खुद्ध निजामशहानंच जाधवरावाला ही सोयरिक करण्यास सांगितलं व जिजाऊ आणि शहाजी यांचे लग्न थाठात झाले.

मध्ययुगीन कालखंडातील जागतिक इतिहासातील सर्वगुणसंपन्न एकमेव वैक्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. पण या वैक्तीला हे जागतिक अढळ स्थान प्राप्त करून देणाऱ्या त्यांच्या माता व मानवतावादी आदर्श जिजामाता यांच्याबद्दल काय सांगावे
शिवरायांच्या आयुष्यातील पन्नास वर्षापैकी पंचेचाळीस वर्षे त्यांच्यावर मायेची नज़र ठेवणारी राजमाता म्हणजेच जिजाऊ

माता जिजाऊ कर्तृव्य फार थोर  म्हटलं पाहिजे, महाराज शिवाजींच्या  बालमनावर त्यांचे संस्कार घडी – घटकेला होत होते. हिऱ्याला पैलू पाडण्यासारखं हे कठीण काम जिजाऊंनी  केलं.  महाभारत व रामायणातल्या आदर्श पुरुषांच्या शौर्याच्या व न्यायाच्या कथा त्या शिवबांना रोज सांगे, तर दुसरीकडे  तऱ्येचे राजकारणाचे धडे, जहागीरीची व्यवस्था व शालेय शिक्षण यांची माहिती देखील स्वतः राजमाता जिजाई च राजेंना देत होत्या .

यवनांचा उच्छेद करून आपणच मराठ्यांचे राज्य स्थापन करण्याचे विचार शिवरायांचा मनात घोळू लागले. माता जिजाऊच्या व माता जगदंबेच्या शुभशीर्वादाने शिवाजी राज्यांनी  तोरणा गड घेऊन स्वराज्याचे तोरण बांधण्यास सुरुवात केली . पुढे शिवबाने आजूबाजूचे किल्ले जिंकून घ्यायला सुरुवात केली. १६४६ सालापासून शिवाजी महाराजांनी  चाकण,पुरंदर,रोहीडा, राजमाची अशी अनेक किल्ले जिंकून घेतले आणि १९७४ साली शिवाजी राजे  छत्रपती शिवाजी महाराज झाले !
शिवबास जन्म देण्यापासून ते त्यांना छत्रपती पदापर्यंत पोहचवणारी महत्वाची वैक्ती म्हणजेच शिवमाता – राजमाता – राष्ट्रमाता – जिजामाता

जिजाऊ माऊलीची  आयुष्यातली एकच इच्छा ‘आपलं मराठयाचं स्वतंत्र राज्य व्हावं’ आणि ती इच्छा त्यांच्या अलौकिक पुत्रांनी म्हणजे आपल्या शिवबांनी पूर्ण केली.

हळूहळू जिजामातेला  थकवा यायला लागलं , त्यांचे वय ८० वर्षाच होत  आलेलं राज्याभिषेकाचा  सोहळा डोळ्य़ाभर पाहिल्यानंतर पंधराच दिवसांनी १६७४ च्या जून महिन्यात राजमाता जिजाबाई स्वर्गवासी झाली. मत कशी असावी याचा एक उच्च आदर्शच त्यांनी आपल्या जीवनात निर्माण केला यात संदेह नाही.

प्लिज नोट: मला आशा आहे तुम्हाला हा राजमाता जिजाई मराठी निबंध (Rajmata Jijau Marathi Nibandh) आवडला असेल.

लक्ष द्या: जर तुमच्या कडे सुद्धा Rajmata Jijau वर अशाच प्रकारे कोणता Marathi Essay असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंद करा. आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुम्ही दिलेला निबंध खूप लोकांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करु..

तसेच तुम्हाला हा Rajmata Jijau Marathi Nibandh आवडला असेल तर Whatsapp आणि facebook द्वारे तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

 

1 thought on “राजमाता जिजाई | Rajmata Jijau Marathi Nibandh | Rajmata Jijau marathi essay”

Leave a Comment