रंगू बाजारला जाते हो | Rangu Bajarala Jate Ho Marathi Lyrics

रंगू बाजारला जाते हो | Rangu Bajarala Jate Ho Marathi Lyrics

गीत – ग. दि. माडगूळकर
संगीत – सुधीर फडके
स्वर – पं. वसंतराव देशपांडे ,  ललिता फडके
चित्रपट – वंशाचा दिवा


रंगू बाजारला जाते हो जाऊ द्या
दही इकाया नेते हो नेऊ द्या

रंगू डुलत डुलत चालते
गोर्‍या नाकात नथनी हालते
हाक मारावी एकदा वाटते, वाटते, वाटते,
राहु द्या..

जरा थांबून बोल ग रंगू
माझ्या मनातलं कसं ग सांगू ?
तुला पाहून काळीज तुटते, तुटते, तुटते,
तुटु द्या..

रंगू वळख आहे मी कोण ?
माझ्या पायातला पैंजण !
मी पायातलं पायात ठेवते, ठेवते, ठेवते,
ठेवु द्या..

तुझा पाठलाग रंगू करीन
अशी मुरडून कान मी धरीन
तुझं कानशील थोडं शेकते, शेकते, शेकते,
चालु द्या..

केली थट्टा अंगाशी आली
लाज रंगूची माझ्या गाली
रंगू मर्दानी थाटात चालते, चालते, चालते,
चालू द्या..

Leave a Comment