रातराणी गीत म्हणे ग | Ratrani geet mhane ga Marathi Lyrics

रातराणी गीत म्हणे ग | Ratrani geet mhane ga Marathi Lyrics

Ratrani geet mhane ga Marathi Lyrics sung by Usha Mangeshkar lyrics written by Shantaram Nandgaonkar, music composed by Anil-Arun.

गीत -शांताराम नांदगावकर
संगीत – अनिल-अरुण
स्वर – उषा मंगेशकर


Ratrani geet mhane ga Marathi Lyrics

रातराणी गीत म्हणे ग
आज मनी प्रीत फुले ग
मीलन राती मी फुलले ग
रातराणी !

अंगअंग डोले झुल्यापरी
मन्मथ येईल मंदिरी
प्रिय सजणाची मी फुलराणी
जीवनगीत जुळे ग
रातराणी !

चांदरात येते फुलापरी
उमलुन आली धरेवरी
आज सुखाची हसली प्राची
नभ धरणीस भिडे ग
रातराणी !

आम्हाला आशा आहे की तुम्हाला Ratrani geet mhane ga Marathi Lyrics बोल समजले असतील. रातराणी गीत म्हणे ग गाण्याच्या बोलाबाबत तुम्हाला काही समस्या असल्यास, कृपया आमच्याशी संपर्क साधा. धन्यवाद.

Leave a Comment