रुपेरी वाळूत माडांच्या | Ruperi Valut mandachya Marathi Lyrics

रुपेरी वाळूत माडांच्या | Ruperi Valut mandachya Marathi Lyrics

गीत -शांताराम नांदगावकर
संगीत – अनिल-अरुण
स्वर – आशा भोसले

रुपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना
बनात ये ना, जवळ घे ना
चंदेरी चाहूल लावीत प्रीतित ये ना
प्रीतित ये ना, जवळ घे ना
बेधुंद आज आसमंत सारा
कुंजात गात मंद धुंद वारा
दाटे उरी प्रिया तुझा इशारा
देहावरी फुले असा शहारा
तुझा इशारा.. असा शहारा
लाजेत आज ही फुले नहाती
गाली अनार प्रीतगीत गाती
तू ये निशा अशी करी पुकारा
दे ये प्रिया मला तुझा निवारा
तुझा निवारा.. तुझा निवारा

Leave a Comment