सचिन तेंडुलकर | Sachin Tendulkar Marathi Nibandh | मराठी निबंध

सचिन तेंडुलकर | Sachin Tendulkar Marathi Nibandh

सचिन तेंडुलकरचा जन्म मुंबईमध्ये एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात झाला. सचिनच्या कुटुंबीयांचे आवडते संगीत दिग्दर्शक सचिन देव बर्मन ह्यांच्या नावावरून त्याचे सचिन असे नाव ठेवण्यात आले. सचिनने त्याच्या शारदाश्रम विद्यामंदिर ह्या शाळेत क्रिकेटचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर ह्यांच्याकडून क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली. शाळेत असताना त्याने आपला मित्र व सहखेळाडू असलेल्या विनोद कांबळीबरोबर हॅरीस शील्ड सामन्यात ६६४ धावांची भागीदारी रचली. १९८८ साली तो आपल्या पहिल्यावहिल्या प्रथम श्रेणी सामन्यामध्ये १०० धावांवर नाबाद राहिला. त्यावेळी तो मुंबई संघामधून गुजरात संघाविरुद्ध खेळत होता. तेव्हा त्याचे वय १५ वर्षे होते आणि त्यावेळी हा विक्रम करणारा तो सर्वांत तरुण खेळाडू होता.

सचिनने आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना १९८९ साली पाकिस्तानविरुद्ध कराची येथे खेळला. त्या सामन्यात त्याने वासिम अक्रम, इम्रान खान, अब्दुल कादिर आणि वकार युनूससारख्या दिग्गज गोलंदाजांचा सामना केला. सचिनची आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील सुरुवात निराशाजनक झाली. वकार युनूस, ज्याचा सुद्धा हा पहिला आंतरराष्ट्रीय सामना होता, त्याने सचिनला १५ धावांवर त्रिफळाचीत केले. याचे उट्टे सचिनने फैसलाबाद येथील कसोटी सामन्यात आपले पहिले अर्धशतक झळकावून काढले. सचिनची आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमधील सुरुवातही खराब झाली. डिसेंबर १८ला झालेल्या आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात खाते उघडण्यापूर्वीच (पुन्हा) वकार युनूसने त्याला बाद केले. तेंडुलकरला खरा सुर त्याच्या १९९१-९२ सालच्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यात गवसला, ज्यात त्याने पर्थमधील वेगवान आणि उसळत्या खेळपट्टीवर सुंदर शतकी खेळी केली. सचिनला आत्तापर्यंत कसोटी सामन्यांमध्ये ११ वेळा सामनावीराचा बहुमान मिळाला आहे व २ वेळा तो मालिकावीर राहिला आहे. सचिनने आपले पहिले एकदिवसीय सामन्यांमधील शतक सप्टेंबर ९ इ.स. १९९४ साली कोलंबो, श्रीलंका येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध नोंदवले. त्याला पहिले आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतक नोंदवण्यासाठी ७९ सामने वाट पहावी लागली.

सचिन हा एकमेव असा खेळाडू आहे की ज्याने रणजी चषक, दुलिप चषक आणि इराणी चषकाच्या आपल्या पहिल्या सामन्यांमध्ये शतक झळकावले. १९९७ साली विस्डेनने सचिनला त्या वर्षीचा सर्वोत्तम वार्षिक क्रिकेटपटू घोषित केले. तेंडुलकर हा नियमितपणे गोलंदाजी करत नसला तरी त्याने १३२ कसोटी सामन्यांमध्ये ३७ बळी आणि ३६५ एकदिवसीय सामन्यांमध्ये १४२ बळींची कामगिरी केली आहे. ज्यावेळेस महत्त्वाचे गोलंदाज अपयशी ठरत असतात त्यावेळेस सचिनला गोलंदाजी देण्यात येते आणि बऱ्याच वेळेस तो बळी मिळविण्यात यशस्वी ठरतो. जरी त्याची गोलंदाजीची सरासरी ५० च्या वर असली, त्याला ‘जम बसलेली फलंदाजांची जोडी फोडण्याचा हातगुण असणारा गोलंदाज’ समजण्यात येते.

मित्र आणि मैत्रीणींनो मी पूजा शिंदे. मला लहान पानापासूनच लिहायला आवडते आणि इंटरनेट वर आल्यावर मला एक गोष्ट समजली कि इंटरनेट वर मराठी मध्ये जास्त कोणी माहिती अपलोड करत नाही आहे. मराठी ही आपली राज्यभाषा आहे आणि आपण मराठी असल्याचा आपल्याला गर्व असला पाहिजे म्हणूनच मी या वेबसाईट द्वारे मराठी भाषेचे जतन करण्याचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment