सांभाळ दौलत सांभाळ | Sambhal Daulat Sambhal Marathi Lyrics

सांभाळ दौलत सांभाळ | Sambhal Daulat Sambhal Marathi Lyrics

गीत – जगदीश खेबूडकर
संगीत – दत्ता डावजेकर
स्वर – अपर्णा मयेकर ,  शरद जांभेकर
चित्रपट – पाच नाजूक बोटे


आम्ही जातोय शेतावरी मागतो बैत्याची भाकरी
बैत्याची भाकरी अन्‌ करतो अंबेची चाकरी
कर सेवा अशी लोकांची- सांभाळ ठेव लाखाची, अशिर्वाद माझा..

येड्या मानसा जपून चाल, देव सांगतो सांज सकाळ
सांभाळ दौलत सांभाळ आरं ही दौलत सांभाळ

ह्यो यज्ञ मांडला कर्मा संगती धर्माचा
ह्यो वारा गातोय मंतर हरीच्या नामाचा
कुणी राकुस येता बाण सुटावा रामाचा
पाप मरावं पुण्य उरावं दुनिया र्‍हाईल खुशाल

ह्ये माणिक मोती तालावरती डुलत्यात
ह्ये रान पाचूचं बघून डोळं दिपत्यात
ही आतुर झाली पिकं, जाऊ द्या पोटात, भुकेल्या पोटात
त्यागावरती सारी जगती अन्‍नब्रह्माची कमाल

पानी सुटंल तोंडाला भूमी होईल अनावर
ही बाग देवाची तुडवा करतिल जनावरं
जीव जगण्यापायी जल्म घेतो जगावर
माया द्यावी ममता घ्यावी सुखाचा होईल सुकाळ

Leave a Comment