संपली कहाणी माझी | Sampali Kahani Majhi Marathi Lyrics

संपली कहाणी माझी | Sampali Kahani Majhi Marathi Lyrics

गीत – शान्‍ता शेळके
संगीत – सुधीर फडके
स्वर – सुधीर फडके
चित्रपट – हा माझा मार्ग एकला


Sampali Kahani Majhi Marathi Lyrics

संपली कहाणी माझी
संपली कहाणी !

धुंद चांदण्या त्या राती
संगतीस होती प्रीती
स्वप्‍नभारल्या जिवाला
आस मीलनाची होती
आस लोपली ती आता म्लान रातराणी !

मुके पाखरू ये कोणी
प्रेमशून्य माझ्या गेही
लळा लावुनी का ऐसा
उडुन आज जावे तेही ?
बाहुलीविना त्या दृष्टी अंध दीनवाणी !

अर्थहीन जीवन झाले
प्रेमबंध तुटता सारे
दिशांतून घेरित आले
क्रूर वादळाचे वारे
विना किनार्‍याची राहे रात ही दिवाणी !

Leave a Comment

x