समुद्र किनार्‍यावरील प्रवासी | Samudra Kinaryavaril Pravasi Marathi Katha | Marathi Story

समुद्र किनार्‍यावरील प्रवासी | Samudra Kinaryavaril Pravasi Marathi Katha

काही लोक समुद्र किनार्‍याजवळून प्रवास करीत असता, दूरवर समुद्रात एक मोठी काळ्या रंगाची वस्तू वाहात येताना त्यांना दिसली. ते पाहून त्या लोकांना एखादे गलबत असावे असे वाटले.काही वेळाने तोपदार्थ जास्त जवळ आल्यावर ते गलबत नसून ती एक लहानशी होडी असावी असे त्यांना वाटले. परंतु किनार्‍यावर आल्यावर पाहातात तो ते साधे काळया रंगाचे गवत आहे असे त्यांना आढळले.

तात्पर्य

– लांबून एखादी गोष्ट मौल्यवान आहे असे वाटते पण जवळून बघितल्यावर प्रत्यक्षात ती अगदी क्षुल्लक असल्याचे आढळून येते.

Leave a Comment