सांग निळ्या निळवंतीला | Sang Nilya Nilvantila Marathi Lyrics

सांग निळ्या निळवंतीला | Sang Nilya Nilvantila Marathi Lyrics

संगीत – श्रीनिवास खळे
स्वर – आशा भोसले
चित्रपट – यंदा कर्तव्य आहे


सांग निळ्या निळवंतीला तीट रेखिली चंद्रकला
नसे पौर्णिमा तरीही चंद्रमा ओती अपुल्या सकल कला

हर्षच माझ्या हृदयी राजा
उणे न काही तुला-मला
या कुंजामधी, तुज-माझ्यामधी स्वर्ग आज रे अवतरला

तू-मी दोन्ही राजा-राणी
घर चिमणे नदीकाठाला
घरात माझ्या उषा नि संध्या सुवर्ण तोरण दाराला

सांग निळ्या निळवंतीला
तीट रेखिली चंद्रकला
आणिक रजनी गाईल गाणी स्वप्‍नांची रिझवायाला

Leave a Comment