संसार हा सुखाचा | Sansar Ha Sukhacha Marathi Lyrics

संसार हा सुखाचा | Sansar Ha Sukhacha Marathi Lyrics

गीत – जगदीश खेबूडकर
संगीत – दत्ता डावजेकर
स्वर – लता मंगेशकर
चित्रपट – घरची राणी


संसार हा सुखाचा, मी अमृतात न्हाते
माझ्या मनात कोणी अंगाई गीत गाते

तू देवरूप माझे मी एकरूप झाले
हिंदोळते उरी मी मन मोहरून आले
वात्सल्य आणि प्रीती जुळले नवीन नाते

वेलीवरी कळीचे झाले फुलून फूल
येता सुगंधवारा पडली तिलाच भूल
दारातल्या तरुला फळरूप आज येते

या भावरम्य लाटा हा सागरी किनारा
होता तसाच आहे हा आसमंत सारा
मज वेगळेपणाचे अपरूप आज वाटे

Leave a Comment

x