सापडले रे सापडले | Sapadle Re Sapadle Marathi Lyrics

सापडले रे सापडले | Sapadle Re Sapadle Marathi Lyrics

गीत – शांताराम आठवले
संगीत – सुधीर फडके
स्वर – प्रमोदिनी देसाई
चित्रपट – वहिनींच्या बांगड्या


सापडले रे सापडले
ते सापडले रे सापडले
ते सापडले

रात्रंदिन जे धुंडित होतो
अजुनि होते जे दडले
रे सापडले ते सापडले

केले होते वेडे ज्यांनी
कोडे अवघड उलगडले
हपापलेल्या हृदयावरती
अमृत कुणीतरी शिंपडले
रे सापडले ते सापडले

नयनीं भरले हृदयी शिरले
शब्दांच्या जे पलिकडले
देवाहुनही थोर मनोहर
दर्शन त्याचे मज घडले
रे सापडले ते सापडले

Leave a Comment