सर्वसर्व विसरु दे | Sarvasarva Visaru De Marathi Lyrics
गीत – मंगेश पाडगांवकर
संगीत – श्रीनिवास खळे
स्वर – अरुण दाते , आशा भोसले
Sarvasarva Visaru De Lyrics
सर्वसर्व विसरु दे, गुंतवू नको पुन्हा
येथ जीव जडविणे हाच होतसे गुन्हा
हे धुके, अशी हवा, ही उदासता भरे
सूर सूर मिटुनिया लोपलीत पाखरे
हास हास लाडक्या श्रावणातल्या उन्हा
रात्र रात्र जागुनी वाट पाहिली कुणी
मंद होऊनी विरे अन् पहाटचांदणी
स्वप्न संपुनी असे ये कठोर वंचना
काय मोर थांबतो मेघ दाटता शिरी ?
भान राधिके नुरे ऐकताच बासरी
बंधनात जन्मतो मुक्तिचा खरेपणा
हाक धुंद ही तुझी अंगअंग वेढिते
होउनी प्रवाह या बंधनात ओढिते
मी मला अजाणता गुंतले अशी पुन्हा
हास हास लाडक्या श्रावणातल्या उन्हा
धुंद धुंद गंध ये दाटुनी फुलाविना