स्पर्धा परीक्षा विज्ञान प्रश्न उत्तरे | Science Question Answers in Marathi 2024

स्पर्धा परीक्षा विज्ञान प्रश्न उत्तरे

विज्ञान या विषयाचा अभ्यास इयत्ता पाचवी, सहावी, सातवी व आठवी या पाठ्यपुस्तकातून केल्यास लवकर समजण्याची शक्यता आहे. कारण महाराष्ट्रात होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये या पुस्तकांच्या बाहेरील प्रश्न विचारला जात नाही. विज्ञान या विषयावर सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये ४-५ प्रश्न नक्कीच विचारले जातात. म्हणून आजच्या या लेखात मी तुमच्या साठी घेऊन आलो आहे स्पर्धा परीक्षा विज्ञान प्रश्न उत्तरे.

Science Question Answers in Marathi 2024

Q. आर्किऑलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ………. याने लिहिला.

A. कार्ल मार्क्स
B मायकेल फुको 
C. लुसिओं फेबर
D. व्हॉल्टेअर

स्पष्टीकरण

  • मायकेल फुको हे फ्रेंच तत्त्वज्ञ व इतिहासकार होते.

Q. सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला ?

A डी. भटकर
B डॉ. गोवारीकर
C. न्यूटन
D. आईन्स्टाईन 

स्पष्टीकरण

  • आईनस्टाईन हे जर्मनीतील एक प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ होते.
  • त्यांचे सूत्र E = mc², जे सापेक्षता सिद्धांतातून तयार झाले, हे जगातील सर्वात प्रसिद्ध समीकरण म्हणून ओळखले जाते.
  • त्यांना 1921 साली भौतिकशास्राचा नोबेल पुरस्कार मिळाला आहे.

Q. भारतीय हरितक्रांतीचे जनक होते.

A. डॉ. वर्गीस कुरीयन
B. डॉ. होमी भाभा
C. डॉ. एम.एस. स्वामीनाथन 
D. डॉ. नॉर्मन बोरलॉग

स्पष्टीकरण

  • डॉ. एम.एस. स्वामीनाथन हरितक्रांतीचे जनक
  • डॉ. वर्गीस कुरीयन – श्वेत क्रांतीचे जनक
  • डॉ. होमी भाभा अणु ऊर्जा कार्यक्रमाचे जनक
  • डॉ. विक्रम साराभाई अवकाश कार्यक्रमाचे जनक

Q. विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला ?

A. राईट बंधू
B. थॉमस एडिसन 
C. एडवर्ड जेन्नर
D. मार्कोनी

स्पष्टीकरण

  • थॉमस एडिसन यांनी विजेचा दिवा, फिल्म फोनोग्राम, ग्रॅहमच्या फोनमधील सुधारणा वगैरे अनेक शोध लावले.

Q. ऊर्जा सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला ?

A. न्यूटन
B. डार्विन
C. गॅलिलीओ
D. आईनस्टाईन

स्पष्टीकरण

  • सापेक्षतेचा विशेष सिद्धांत जून 30, इ.स. 1905 रोजी प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांनी मांडला.
  • सूत्र E = mc²
  • या सिध्दांताच्या आधारे अणूबॉब व अणूऊर्जा तयार केली.

Q. इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला ?

A. रुदरफोर्ड
B. जे. जे. थॉमसन
C. जेम्स चॅडविक
D. न्यूटन

स्पष्टीकरण

  • प्रोटॉनचा शोध – गोल्डस्टिव्ह
  • न्यूट्रॉन – चॅडविक
  • इलेक्ट्रॉन – जे.जे. थॉमसन

Q. शून्याचा शोध कोणी लावला ?

A. आर्यभट्ट
B. वराहमिहीर
C. न्यूटन
D. एडिसन

आर्यभट्ट
आर्यभट्ट

 

स्पष्टीकरण

  • थॉमस एडिसन – विद्युत दिव्याचा शोध
  • न्यूटन गतिविषयक नियम, गुरुत्वीय बलाचे नियम, प्रिझमचा शोध, दुर्बिणीचा शोध, कॅलक्युलसचा जनक
  • आर्यभट्ट हे महान गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होते.
  • त्यांचा ग्रंथ आर्यभटीय
  • 1975 साली भारताने पाठवलेल्या पहिल्या उपग्रहाचे नाव ‘आर्यभट्ट’ होते.

Q. पेनिसिलिन या औषधाचा शोथ खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला ?

A. अलेक्झांडर फ्लेमिंग
B. लुईस पाश्चर
C. सी. व्ही. रामन
D. डॉ. हरगोविंद खुराणा

स्पष्टीकरण

  • अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिनचा शोध लावला.
  • पेनिसिलिन हे पहिले प्रतिजैविक (Antibiotics) होते व ते आजही वापरात आहे.

Q. ‘वर्गिस कुरियन’ हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहेत ?

A. आर्थिक धोरण
B. हरितक्रांती
C. धवलक्रांती 
D. शैक्षणिक धोरण

स्पष्टीकरण

  • वर्गिस कुरियन – धवलक्रांतीचे जनक
  • वर्गिस कुरियन यांनी ‘AMUL’ या कंपनीच्या माध्यमातून कार्य केले.

Q. भारतीय ‘श्वेतक्रांतीचे’ जनक म्हणून ना ओळखले जाते.

A. एम.एस. स्वामीनाथन
B. बी.पी. पाल
C. के.एन. बदल
D. व्ही. कुरियन 

स्पष्टीकरण

  • त्यांना मिळालेले पुरस्कार पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, रॅमन मॅगसेसे, जागतिक अन्न पुरस्कार.
  • 1965 – राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाची स्थापना.

Q. 28 फेब्रुवारी हा दिवस ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून कोणत्या शास्त्रज्ञाच्या शोधाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो?

A. डॉ. चंद्रशेखर वेकेंट रमन 
B. विक्रम साराभाई
C. एपीजे अब्दुल कलाम
D. के. आर. राव

स्पष्टीकरण

  • डॉ. चंद्रशेखर वेकंट रमन यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी प्रकाशाचे अपस्करण हे संशोधन प्रकाशित केले.
  • त्यामुळे 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो.
  • राष्ट्रीय विज्ञान दिन – 28 फेब्रुवारी
  • राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन 11 मे

Q. खालीलपैकी स्मॉलपॉक्स आजाराच्या लसीचा शोध कर्ता कोण होता?

A. औरस्टॉटल
B. आयड्रॉक न्यूटन
C. एडवर्ड जेन्नर
D. थॉमस एडिसन

स्पष्टीकरण

  • स्मॉलपॉक्स (Small Pox) म्हणजे देवी रोग होय.
  • एडवर्ड जेन्नर यांनी देवी रोगावर लस शोधली.
  • त्यांना लसीकरण पद्धतीचा जनक असेही म्हणतात.

Q. ‘न्यूरोलॉजी’ ही विज्ञानाची शाखा कोणत्या विषयाशी निगडित आहे?

A. हाडांचा अभ्यास
B. दातांचा अभ्यास
C. चेतासंस्थेचा अभ्यास
D. प्रसुतीशास्राचा अभ्यास

स्पष्टीकरण

  • न्यूरोलॉजी – चेतासंस्थेचा अभ्यास (Neurology)
  • ऑस्टिओलॉजी – हाडांचा अभ्यास (Osteology)
  • ओडोन्टों लॉजी – दातांचा अभ्यास (Odontology)
  • गायनॉकॉलॉजी – प्रसुती शास्राचा अभ्यास (Gyanocology)

Q. ‘अ‍ॅस्ट्रॉनॉमी’ ही संज्ञा खालीलपैकी कशाच्या अभ्यासाशी संबंधित आहे?

A. हवामान
B. ग्रह-तारे 
C. कीटक
D. हाडे

स्पष्टीकरण

  • अवकाशशास (Astronomy) ग्रह व ताऱ्यांचा अभ्यास
  • ऑस्टिओलॉजी (Osteology) – हाडांचा अभ्यास
  • एन्टामॉलॉजी (Entomology) – कीटकांचा अभ्यास
  • मिटीओरॉलॉजी (Meteorology) हवामान विषयाचा अभ्यास

Q. अनुवंशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला?

A. मेंडेल 
B. डार्विन
C. लॅमार्क
D. मेडेलिव्ह

स्पष्टीकरण

  • जॉन मेंडेल यांनी अनुवंशिकता सिद्धांत मांडला.
  • त्यांनी वाटाण्याचा झाडांवर केलेल्या प्रयोगातून हा सिद्धांत मोडला.
  • उदा. वडिलांना टक्कल असल्यास मुलाला टक्कल पडण्याची शक्यता असते, असे त्यांनी दाखवून दिले.

संशोधक आणि शोध

संशोधक शोध
मेंडेल अनुवंशिकतेचा सिद्धांत
मेडेलिव्ह आवर्तसारणी
लॅमार्क इंद्रियाचा वापर करण्याचा सिद्धांत
डार्विन उत्क्रांतीवादाचा सिद्धांत

 

Q. न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला ?

A. जेम्स चॅडविक 
B. न्यूटन
C. रुदरफोर्ड
D. जे. जे. थॉमसन

महत्त्वाचे शोध संशोधक
प्रोटॉन गोल्डस्टिन
न्यूट्रॉन चंडविक
इलेक्ट्रॉन थॉमसन
पॉझिट्रॉन अँडरसन
ऑक्सिजन प्रिस्टले

 

Q. विमानाचा शोथ खालीलपैकी कोणी लावला?

A. आईनस्टाईन
B. न्यूटन
C. राईट बंधू
D. कोपरनिकस

स्पष्टीकरण

  • राईट बंधूनी 1903 मध्ये विमानाचा शोध लावला.

Q. कोणत्या शास्त्रज्ञाने 1949 साली सर्वेक्षणाचे तंत्र विकसित केले?

A. गार्डन विली
B. गार्डन ट्रेसर
C. गार्डन कायसन
D. गार्डन लीला

स्पष्टीकरण

  • गार्डन विली या संशोधकाने सर्वेक्षणाचे तंत्र विकसित केले.
  • याचा शोध 1949 साली पेरू देशात लावला.
  • या तंत्रज्ञानाचा उपयोग इतिहास संशोधनासाठी होतो.

Q. सन 1859 मध्ये चार्ल्स डार्वीनने …………… या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला.

A. हिस्ट्री ऑफ आर्कीओलॉजी
B. ओरीजीन ऑफ स्पीसीज
C. ओरीजीनऑफ बॉटनी
D. एशियाटीक रिसर्पस

स्पष्टीकरण

  • चार्ल्स डार्वीनने origin of species या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला.
  • त्यात त्यांनी निसर्गात जगताना ‘बळी तो कान पिळी’ असा सिद्धांत मांडला.
  • माणसाची निर्मिती माकडासारख्या प्राण्यांपासून झाली, असा दावा त्यांनी केला.
  • डार्विनने ‘डिसेंट ऑफ मॅन’ हा ग्रंथही लिहीला.
  • डार्विनचा सिद्धांत ‘उत्क्रांतीचा सिद्धांत’ म्हणून ओळखला जातो.

Q. कागदाचा शोध. या देशामध्ये लागला.

A. जपान
B. चीन
C. जर्मनी
D. इंग्लंड

स्पष्टीकरण

  • सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी चीनमध्ये कागदाचा शोध लागला.
  • त्याआधी ताम्रपत्राचा वापर केला जाई.
  • चीन मध्ये लागलेले महत्त्वाचे शोथ
  • कागद, छपाईयंत्र, बंदुकीची दारू, दिशायंत्र, दारू

Q. सुप्रसिद्ध अणु सिद्धांत………शास्त्रज्ञांनी मांडला.

A. जॉन डाल्टन
B. रुदरफोर्ड
C. जे. जे. थॉमस
D. यापैकी नाही

स्पष्टीकरण

  • अणु सिद्धांत (Atomic Theory) जॉन डाल्टन यांनी मांडला.
  • अणु म्हणजे लहानात लहान कण असे त्यांनी सांगितले.
  • त्यांनी अणूंना संज्ञा म्हणून चिन्हे वापरली.
संशोधक संशोधन
कणाद महर्षी अणूंना परमाणू नाव दिले.
जे. जे. थॉमसन अणुमध्ये प्रॉटॉन व न्यूट्रॉन असतात.
रुदरफोर्ड अणुची ग्रहगोलीय प्रतिमा.
नील्स बोर केंद्रकाभोवतालची कक्षा KLMN

 

Q. द्रव्य ज्या अविभाज्य कणांनी बनलेला असतो त्यांना परमाणु म्हणतात, असे भारतीय तत्वज्ञान………….यांनी सांगितले.

A. कणाद 
B. आर्यभट्ट
C. ब्रम्हभट
D. यापैकी नाही

स्पष्टीकरण

  • द्रव्य ज्या अविभाज्य कणांनी बनलेले असते, त्याला परमाणु असे नाव कणाद महर्षीनी दिले.
  • प्राचीन इतिहासातील कणाद महर्षी हे महान तत्त्वज्ञानी होते.
  • त्यांनी सर्वप्रथम अणुची अप्रत्यक्ष कल्पना मांडली.

परीक्षेसाठी उपयुक्त

  • आर्यभट्ट हे महान गणित तज्ञ होते.
  • पृथ्वी व इतर ग्रह सूर्याभोवती फिरतात असे त्यांनी सांगितले.
  • भारताने पहिला उपग्रह 1975 साली अवकाशात सोडला व त्याला आर्यभट्ट असे नाव देण्यात आले.

Q. जहाजे व पाणबुड्या यांच्या रचनेत या शास्त्रज्ञाचे तत्त्व वापरतात.

A. न्यूटन
B. आर्किमिडीज
C. गॅलेलिओ
D. ग्रहम बेल

स्पष्टीकरण

  • आर्किमिडीज तत्त्व द्रवात एखादा पदार्थ बुडविला असता तो आपल्या वजनाइतका द्रव बाजूला सारतो.

हे देखील वाचा

संयुक्त महाराष्ट्र समिती संपूर्ण माहिती

Leave a Comment