शब्द शब्द जुळवुनि | Shabd Shabd Julavuni Marathi Lyrics

शब्द शब्द जुळवुनि | Shabd Shabd Julavuni Marathi Lyrics

गीत – ग. दि. माडगूळकर
संगीत – दत्ता डावजेकर
स्वर – सुमन कल्याणपूर
चित्रपट – सुखाची सावली


शब्द शब्द जुळवुनि वाचिते तुझ्या मना
आवरू किती गडे, धीर नाही लोचना

अजाणतेपणी कुणी मला कुणास वाहिले
असेल देव तो तरी मी न त्यास पाहिले
आंधळी कळी खुळी मजसि काय कल्पना

उघडताच पाकळी लाभली तुझी दिठी
तुजसि देव मानुनी घातली गडे मिठी
नीतिपाठ ओरडे हीच पापवासना

पापपुण्य ना कळे उरे उरात आस रे
हेच पाय पूजिणे असा जिवास ध्यास रे
देव तू उभा सजीव घ्यावयास पूजना

Leave a Comment