शांती-दीप हा आज | Shanti-deep Ha Aaj Marathi Lyrics

शांती-दीप हा आज | Shanti-deep Ha Aaj Marathi Lyrics

गीत – वसंत नलावडे
संगीत – श्रीनिवास खळे
स्वर – मन्‍ना डे


Shanti-deep Ha Aaj Lyrics

पृथ्वीगोल हा उजळुनी सगळा
शांती-दीप हा आज निमाला

भारतमाते तुझिया पोटी
रत्‍न जन्मली कोटी कोटी
जगताची या दिपवून दृष्टी
निघे जवाहर लाल आजला
शांती-दीप हा आज निमाला

पुसुनी दीन-दुबळ्यांचे आंसू
फुलवुनिया सूख-शांती-हासू
शमवून सारे युद्ध पिपासू
पुलकित करूनी सर्व भूतला
शांती-दीप हा आज निमाला

पुरे अता अणुशस्‍त्र निर्मिती
कोटी जिवांची त्यात आहुती
रम्य जगा ती नको विस्मृती
शांतीमंत्र हा देऊनी सकला
शांती-दीप हा आज निमाला

Leave a Comment

x