शतकांच्या यज्ञातुन | Shatakanchya Yadnyatun Marathi Lyrics

शतकांच्या यज्ञातुन | Shatakanchya Yadnyatun Marathi Lyrics

Shatakanchya Yadnyatun Marathi Lyrics: This songs is sung by Lata Mangeshkar. Vedat Marathe Veer song is written by Shankar Vaidya and music given by Pt. Hridaynath Mangeshkar

गीत – शंकर वैद्य
संगीत – पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर – लता मंगेशकर


Shatakanchya Yadnyatun Marathi Lyrics

शतकांच्या यज्ञातुन उठली एक केशरी ज्वाला
दहा दिशांच्या हृदयांमधुनी अरुणोदय झाला

शिवप्रभूंची नजर फिरे अन्‌ उठे मुलूख सारा
दिशा-दिशा भेदीत धावल्या खड्गाच्या धारा
हे तुफान स्वातंत्र्याचे
हे उधाण अभिमानाचे
हे वादळ उग्र वीजांचे
काळोखाचे तट कोसळले चिरा-चिरा ढळला

कडेकपारी घुमू लागले विजयाचे गान
जळल्या रानातुनी उमलले पुन्हा नवे प्राण
रायगडावर हर्ष दाटला खडा चौघडा झडे
शिंगांच्या ललकारीवरती भगवा झेंडा उडे
शिवराय भाग्य देशाचे
हे संजीवन प्राणांचे
हे रूप शक्तियुक्तीचे
हा तेजाचा झोत उफाळुन सृष्टितुन आला

गंगा-सिंधू-यमुना-गोदा कलशातुन आल्या
शिवरायाला स्‍नान घालुनी धन्य धन्य झाल्या
धिमी पाउले टाकीत येता रुद्राचा अवतार
अधीर हृदयातुनी उमटला हर्षे जयजयकार

प्रौढप्रताप पुरंदर क्षत्रियकुलावतंस
सिंहासनाधिश्वर महाराजाधीराज शिवछत्रपती महाराज

‘शिवछत्रपतींचा जय हो !’
‘श्रीजगदंबेचा जय हो !’
‘या भरतभूमिचा जय हो !’
जयजयकारातुनी उजळल्या शतकांच्या माला

 

आम्हाला आशा आहे की तुम्हाला Shatakanchya Yadnyatun Marathi Song या गाण्याचे बोल समजले असतील. शतकांच्या यज्ञातुन या गाण्याच्या बोलाबाबत तुम्हाला काही समस्या असल्यास, कृपया आमच्याशी संपर्क साधा. धन्यवाद.

Leave a Comment

x