शेताला रं माझ्या नगं | Shetala Re Majhya Naga Marathi Lyrics

शेताला रं माझ्या नगं | Shetala Re Majhya Naga Marathi Lyrics

गीत – दत्ता डावजेकर
संगीत – दत्ता डावजेकर
स्वर – लता राव


शेताला रं माझ्या
नगं लावू नजर तुझी अस्मानी पांखरा

किती बघू तरी
भिरीभीरी
नको रं करू चोरी धटिंगण चोरा

कसा सळसळतो जोंधळा
नाही पिकला अजुनि कोवळा
तुला सदाच त्याचा लळा
हा दर्या मोत्याचा, लाख मोलाचा
झुलुदे रे झरझरा

जरी येशिल शेतावरी
मी गोफण नेमुन धरीं
तो फटका बसंल उरीं
तो घाव जिव्हारी फिरंल सुर्सुरी
येशिल ना माघारा

Leave a Comment